Loksabha 2019 : महिला मतदानाची टक्केवारी अर्धशतक गाठेना

Loksabha 2019 :  महिला मतदानाची टक्केवारी अर्धशतक गाठेना

गेल्या ३० वर्षांमध्ये झालेल्या ९ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण पुण्यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दिसून येत नाही. १९८४ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता १९९६ च्या निवडणुकीत महिलांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४९.५६ टक्के होते. त्याचबरोबर गेल्या ३० वर्षांत महिला मतदारांच्या टक्केवारीतील वाढ ही अगदीच जेमतेम आहे.

देशातील मतदार बदलत आहे, तो अधिक तरुण होत आहे. देशात ३५ ते ४४ वर्षे वयोगटातील २४.३ टक्के मतदार असून, वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्या मतदारांचे प्रमाण १२.२ टक्के आहे. यंदा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते २४ वर्षे वयोगटातील मतदारांचे प्रमाण हे ९.१ टक्के आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात १९८४ ते २०१४ या तीस वर्षांमधील निवडणुकांमध्ये महिला मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत नसल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. पुण्यासारख्या प्रगत आणि पुरोगामी शहरातील महिलांमधील मतदानाचे प्रमाण कमी असणे, हा चिंतेचा विषय आहे. 

पुण्यात १९८४ ते १९९१ या तीन निवडणुकांमधून महिलांच्या मतदानाचे प्रमाण सातत्याने कमी झाले आहे; पण त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत हे प्रमाण ४९.५६ पर्यंत वाढले. हे गेल्या ४३ वर्षांमधील १२ निवडणुकांमधील महिलांनी केलेले सर्वाधिक मतदान आहे. देशात आघाडी सरकारच्या काळात पुण्यातील महिलांनी मतदानाकडे पाठ फिरवलेली दिसते. १९९८, १९९९ या दोन्ही निवडणुकांमध्ये ४८ टक्‍क्‍यांच्या दरम्यान महिलांनी मतदान केले आहे. 

आतापर्यंत महिला पुरुषांच्या सांगण्यावरून मतदान करत असल्याचे चित्र दिसत होते; पण आता नवीन मुली या स्वतःच्या मनाने मतदान करतात. त्या स्वतःला योग्य वाटेल, त्याच उमेदवाराला मत देतात. त्यामुळे पुढील काळात महिला मतदानाची टक्केवारी ही पुरुषांच्या बरोबरीने असेल, असा विश्‍वास वाटतो.
- अनुजा देशपांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com