Losabha 2019 : निवडणुका समोर ठेऊन काँग्रेसकडून पोकळ घोषणाबाजी : प्रकाश जावडेकर यांची टीका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

.... आणि हात जोडून जावडेकर निघाले 
नरेंद्र मोदींनी "सबका साथ सबका विकास' केला, त्यांच्यावर जनतेचा विश्‍वास आहे, तर मग सुजय विखे पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासह ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनी भाजपमध्ये का घेतले जात आहे असा प्रश्‍न जावडेकर यांनी विचारला. त्यावेळी जावडेकर यांनी ह मी या विषयावर बोलण्यासाठी आलेलो नाही,असे म्हणत हात जोडून पत्रकार परिषदेतून निघून गेले.

पुणे : देशात काँग्रेसची 50 वर्ष सत्ता होती, पण त्यांनी गरीबांना कधी 12 रूपये दिले नाहीत, ते आता वर्षाला 72 हजार रूपये देणार सांगत आहे. काँग्रेस बोलाची कडी बोलाचा भात असून, निवडणुका जिंकण्यासाठी ते पोकळ घोषणा करत आहेत, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसने गरीबी हटावचा पुन्हा एकदा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या यांच्यावर टीका केली होती. त्यास जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले. शहराध्यक्ष योगेश गोगावले, उज्वल केसकर यावेळी उपस्थित होते. 

केंद्रातून पाठवलेल्या 100 रूपयांपैकी केवळ 15 रूपये गरीबांना मिळतात असे राजीव गांधीच म्हणाले होते, पण नरेंद्र मोदी यांच्या काळात 100 रूपये थेट सामांन्यांच्या खात्यात जमा होत आहे. सरकारने साडेचार लाख कोटींची सबसीडी बँक खात्यात जमा केल्याने त्यांची चोरी झाली नाही. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. पण त्यांनी गरीबांसाठी कहीच केले नाही. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले, पण मोदी सरकारने 34 महिन्यात 34 कोटी बँक खाते काढले आहेत. काँग्रेस निवडणुकीत हारणारच आहे त्यामुळे ते खोटे आश्‍वासने देत आहेत. 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जेवढे परदेश दौरे झाले, तेवढेच दौरे मोदींनी केल आहेत. पण मोदींमुळे भारताची जगभरात प्रतिमा उंचावली. ज्यांनी कधी 3- 4 टक्‍क्‍यांच्या पुढे जीडीपी जाऊ दिला नाही ते आता 12 टक्के करणार म्हणताहेत. काँग्रेस केवळ निवडणूक समोर ठेऊन घोषणा करत आहेत. काँग्रेसने राजस्थान, कर्नाटक, पंजाब मध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणुक आहे, काँग्रेस जिंकणार नाही हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी घाबरगुंडी उडाली आहे. अशी टीका जावडेकर यांनी केली. 

.... आणि हात जोडून जावडेकर निघाले 
नरेंद्र मोदींनी "सबका साथ सबका विकास' केला, त्यांच्यावर जनतेचा विश्‍वास आहे, तर मग सुजय विखे पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासह ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनी भाजपमध्ये का घेतले जात आहे असा प्रश्‍न जावडेकर यांनी विचारला. त्यावेळी जावडेकर यांनी ह मी या विषयावर बोलण्यासाठी आलेलो नाही असे म्हणत हात जोडून पत्रकार परिषदेतून निघून गेले.

Web Title: Prakash Javadekar criticized about Congress's for misleading declaration before election