Loksabha 2019 : पुण्याचा उमेदवार 3 तारखेला अर्ज भरणार : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे : ''मोठ्या शहरांमध्ये आम्हाला खूप अपयश आले. भाजपचे वातावरण असल्याने शहरी भागात भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे शहरी भागात निकराची लढाई लढणार आहोत. मी पुण्यासाठी दोन नावे सुचविली आहेत. लवकरच नाव जाहीर होईल. पुण्याचा उमेदवार लवकर जाहीर करण्यात येईल आणि 3 एप्रिलला उमेदवार अर्ज भरणार आहे'',अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.​

पुणे : ''मोठ्या शहरांमध्ये आम्हाला खूप अपयश आले. भाजपचे वातावरण असल्याने शहरी भागात भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे शहरी भागात निकराची लढाई लढणार आहोत. मी पुण्यासाठी दोन नावे सुचविली आहेत. लवकरच नाव जाहीर होईल. पुण्याचा उमेदवार लवकर जाहीर करण्यात येईल आणि 3 एप्रिलला उमेदवार अर्ज भरणार आहे'',अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (सोमवार) सकाळ कार्यालयाला भेट दिली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत पुण्यातील उमेदवाराबाबतही माहिती दिली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''गेल्या पाच वर्षांत मोदींची काम करण्याची पद्धत पाहिली तर त्यांची हुकुमशाही वृत्ती दिसून येते, नोटाबंदी, शेतकऱ्याबाबतचे धोरण, संस्था नष्ट करण्यात आल्या. मोदींच्या ताब्यात संस्था गेल्या आहेत. हुकुमशाहीकडे प्रवास त्यांचा असून, निम्मा प्रवास झाला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत व संविधान राहणार नाही. पुन्हा निवडणुका होणार नाहीत या माझ्या विधानावर मी आजही कायम आहेत. आम्ही यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्यावेळी आम्ही म्हटले नव्हते. लोकशाहीच्या संस्था तोडून टाकल्या असून, लोकशाहीचा अपमान होत आहे. हवाई हल्ल्यांबाबत संरक्षण मंत्र्यांनाच माहिती नाही. ग्रामीण भागात कृषी अर्थव्यवस्था हा प्रमुख मुद्दा आहे. मोदींनी कृषीमुल्य कमी केले असून, शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळत आहे. महागाईचा दर कमी करण्यासाठी त्यांनी काही केले नाही. शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून दिला नाही. आमच्या सरकारच्या काळात हमीभाव जास्त दिला गेला. कर्जमाफी देण्यासाठी दोन वर्षे आम्ही मागणी करत होतो. पण, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्जमाफी केली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. शहरी भागात रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा असून, रोजगाराची निर्मिती होत आहे.''

मुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या साम, दाम, दंड, भेद या नितीमुळे अनेक राजकारणी भाजपमध्ये जात आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतील अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. स्वतःचे संस्था निर्माण झाल्याने अशी लोक पक्षाचा विचार न करता बंडखोरी करतात. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने लोकसभेचे तिकीट जिथे मिळून तेथून घेण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा विचार असून, आम्ही तेथे ताकदीने लढणार आहोत. काळापैसा पांढरा करण्यासाठी तुम्ही नोटाबंदी केली. तुमचेच नेते तुमच्यावर टीका करत आहेत. युवा मतदारांना तुम्ही काय आश्वासन देणार आहात. मोदींनी वैयक्तिक टीकेशिवाय काही केले नाही. जुमलेबाजी, जाहिरातबाजी करण्यात येत आहे. पनामा पेपर्सबाबत पाकिस्तानने भ्रष्टाचारविरोधी कारवाई आपल्यापेक्षा वेगवान केली आहे. पण, भारतात तशी कारवाई झाली नाही. राफेलचा करार मोदींच्या सहीने झाला आहे, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. राफेलबाबत एकही आकडा आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. वंचित आघाडीचा अजेंडा विरोधकांच्या मतांचे विभाजन करण्याचा आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

- प्रियांका गांधी यांचा प्रभाव पडेल आणि त्यांचा  महाराष्ट्रातही प्रचार होईल
- राज ठाकरेंचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी मोदींचा विरोध केला आहे
- काळापैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी केली
- वंचित बहुजन आघाडीचा फायदा भाजपलाच होईल
- सहकारी संस्थांशी संबंधित राजकारण्यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर

Web Title: Pune candidate will fill application on 3rd April : Prithviraj Chavan