Loksabha 2019 : महायुती ही कार्यकर्त्यांची पार्टी, घराणेशाहीची नाही : गिरिश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे :''आयुष्यभर घाम गाळून, रक्त सांडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी सलाम करतो. आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांना हृदयात स्थान देणारे आहोत. घटक पक्षातील कार्यकर्ते आमचा आत्मा आहे ज्यांनी पक्ष, संघटना आणि विचारधारा जिवंत ठेवली. महायुती ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कोणत्याही घराणेशाहीतून आलेली पार्टी नाही.'' अशी प्रतिक्रिया पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.

पुणे :''आयुष्यभर घाम गाळून, रक्त सांडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी सलाम करतो. आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांना हृदयात स्थान देणारे आहोत. घटक पक्षातील कार्यकर्ते आमचा आत्मा आहे ज्यांनी पक्ष, संघटना आणि विचारधारा जिवंत ठेवली. महायुती ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कोणत्याही घराणेशाहीतून आलेली पार्टी नाही.'' अशी प्रतिक्रिया पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल व पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी निवडणूकीसाठी अर्ज भरला. यावेळी नरपगिरी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते' बोलत होते.   

''मोदींनी २०१४ ला इतिहास घडविला आहे. मोदींनी देश प्रगतीच्या दिशेने नेला आहे. जे काँग्रेसने ५० वर्षात केले नाही ते 'त्यांनी' ५ वर्षात केले. त्यासाठी  महायुती पुन्हा विजयी करू. मोदी घराणेशाहीतून आलेले नाहीत तर त्यांच्य़ावर संघाचे संस्कार आहेत. धर्मासाठी, देशासाठी त्यांनी सेवा केली. लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांना तुमचा आशिर्वाद द्या. २३ तारखेपर्यंत गहाळ राहू नका. आता आपण घरोघरी जाऊ आणि  पुढच्या २३ तारखेला विजय साजरा करू.''अशी प्रतिक्रिया देत बापटांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच ''कांचन कुल ताई दिल्लीत आल्यानंतर बाकी सगळे गुल होणार आहेत. असाही टोला त्यांनी लगावलाय 

यावेळी पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळेही, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे उपस्थित होते. पुण्याचे ग्रामदैवत व मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन बापटांनी अर्ज भरला. पुण्यातील वातावरण हे सकारात्मक व चांगले आहे. अर्ज भरण्यासाठी सुरू झालेल्या या मिरवणुकीत महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थितीत होते. तसेच काही दिवसांपूर्वी बंडाचे निशाण उभे केलेले आहे. खासदार संजय हे ही या मिरवणूकीत सहभागी झाले आहे.

Web Title: Punes BJP candidate Girish Bapat talked about opposition parties and Hereditary Politics