Loksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी शनिवारी प्रचारफेरी शक्तिप्रदर्शन केले.

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी शनिवारी प्रचारफेरी शक्तिप्रदर्शन केले. सुजात प्रकाश आंबेडकर फेरीत सहभागी झाले होते.
 
विश्रांतवाडी चौकातून फेरीला सुरवात झाली. सुजात आणि जाधव यांचे नागरिकांनी स्वागत केले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. "बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, सबकी खुशी कप बशी, येऊन येऊन येणार कोण अनिल जाधव शिवाय आहेच कोण,' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. विश्रांतवाडी, नागपूर चाळ, येरवडा, शांतिनगर, म्हाडा कॉलनी, आंबेडकर वसाहत, नवी खडकी, बंडगार्डन, मंगळवार पेठ, भवानी पेठमार्गे दांडेकर पूल येथे प्रचारफेरीचा समारोप झाला. भविष्यात वंचित आघाडी सत्तेत येणार आहे. कॉंग्रेस आणि भाजपचा पराभव वंचित आघाडी करू शकते, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला. भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, एमआयएमचे अध्यक्ष लियाकत शेख, वसंत साळवे, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे या वेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rally in Vanchit Bahujan Aaghadi In pune