Loksabha 2019 : संजय काकडे अद्यापही भाजपचे सहयोगी खासदार : गोगावले

download (1).jpg
download (1).jpg

पुणे : "आमचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ज्या काही घोषणा किंवा महिती दिली, ती पत्रकारांशी संवाद करून केली आहे. त्यांनी आजपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती पक्षाला दिलेली नाही. ती ज्या वेळी सांगतील त्या वेळी पक्ष त्यांच्या बाबतचा निश्‍चित निर्णय घेईल. त्यामुळे सध्या तरी ते भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार आहेत,'' अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. 

संजय काकडे हे काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर काकडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटले. त्यामुळे काकडे यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू होती. अशा स्थितीतही पक्षाच्या अधिकृत बॅनरवर खासदार काकडे यांचे छायाचित्र कसे, या प्रश्‍नाला उत्तर देताना गोगावले यांनी ही माहिती दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com