Loksabha 2019 : बारामतीत एसटीचे वेळापत्रक कोलमडले

Schedule of the Baramati ST has gone wrong because of loksabha 2019
Schedule of the Baramati ST has gone wrong because of loksabha 2019

लोकसभा 2019
बारामती शहर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बारामती व बारामती एमआयडीसी या आगाराच्या तब्बल 66 बस अधिग्रहीत केल्यामुळे आज एसटीचे वेळापत्रक कोलमडले.

दरम्यान येत्या 25 तारखेपर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहील अशी माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली. मतदानाच्या कामासाठी दर निवडणुकीच्या वेळेस राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या अधिग्रहित केल्या जातात. त्यानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील बारामती आगाराच्या 54, तर बारामती एमआयडीसी आगाराच्या 12 गाड्या अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

एकाच वेळेस 66 गाड्या अधिगृहीत केल्यामुळे बारामतीतील एसटीचे वेळापत्रकच आज कोलमडले. जवळच्या मार्गावरील अनेक फेऱ्या आज रद्द कराव्या लागल्या अशी माहिती अमोल गोंजारी यांनी दिली. दरम्यान येत्या 25 तारखेपर्यंत एसटीचे वेळापत्रक असेच अनियमित असेल, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी बारामती आगाराशी वेळापत्रका बाबत संपर्क साधून मगच प्रवासाचे नियोजन करावे, अशी सूचना अमोल गोंजारी यांनी केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com