Loksabha 2019 : डॉ. अमोल कोल्हेंनी केले शिवजन्मभूमीला वंदन

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 24 मे 2019

निवडणुकीतील विजयानंतर शिवजन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी येणारे डॉ. कोल्हे हे पहिलेच विजयी उमेदवार ठरले.

लोकसभा 2019
जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले.

शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन केले यानंतर शिजन्मस्थळी शिवजन्मभूमीला नतमस्तक झाले.

निवडणुकीतील विजयानंतर शिवजन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी येणारे डॉ. कोल्हे हे पहिलेच विजयी उमेदवार ठरले. यामुळे ते खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी अतुल बेनके, सूरज वाजगे, दिनेश दुबे, भाऊ कुंभार, अभिजित शेरकर, सुनिल ढोबळे, उज्वला शेवाळे, पापा खोत, वैष्णवी चतूर, बाळा सदाकाळ, प्रकाश ताजणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणूकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटीबद्द राहणार असून किल्ले संवर्धन तसेच रायगड महोत्सवाप्रमाणे शिरूर लोकसभा मतदार संघात शिवमहोत्सव साजरा करण्यासाठी तसेच पुणे नाशिक मार्गाचे काम येत्या काही दिवसात मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

amol kolhe


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirir MP Dr Amol Kolhe bow down at the king shivajis birth place