Loksabha 2019: जोशी असलात तरी तुम्ही बहुजनाळलेले जोशी- अंधारे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

- जोशी, तुम्ही जरी जोशी असलात तरी तुम्ही बहुजनच आहात
- प्रा. सुषमा अंधारे यांनी मोदी यांची मागील लोकसभा निवडणुकीत केलेल्या घोषणांवरून खिल्ली

पुणे: मोहन जोशीजी, तुम्ही जरी जोशी असलात तरी तुम्ही बहुजनच आहात, असे वक्तव्य महाआघाडीच्या नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केले. प्रा. सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागील लोकसभा निवडणुकीत केलेल्या घोषणांवरून खिल्लीही उडविली.

प्रा. अंधारे म्हणाल्या की, ज्याला कोणाला स्वतःच्या हाताला चुना लाऊन घ्यायचा असेल, त्यांनी बिनधास्त भाजपात जावे. जोशी बहुजनाळलेले जोशी आहेत. त्यांना निवडुन आणण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करू आणि त्यांना निवडणुच आणू विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोबतच, तुम्हाला स्वतःचे कुटुंबच नाही. मग तुम्ही दुसऱ्याच्या कुटुंबाचा विचार कशाला करता? अला प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या कुटुंबाबाबतीत केलेल्या टीकेचा संदर्भ देत अंधारे यांनी केला.
 

दरम्यान, वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनीही आपली आत्या असलेल्या सुप्रिया सुळेंच्या अर्ज भरण्याच्या वेळच्या सभेला पहिल्यांदाच उपस्थिती लावली. सुळे यांच्यासोबतच ते सभास्थानी आले. पार्थ यांचा हात धरून सुप्रिया सुळेंनी त्यांना व्यासपीठावर नेले. पुण्यातील नरपतगीर चौकातील सभेत भाषणे झाल्यानंतर दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. या सभेत भाजपवर सर्वच वक्त्यांनी टीका केली.

 

Web Title: Sushma Andhare criticise on Narendra modi