Loksabha 2019 : मावळचे रणांगण तापण्यास सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची उद्या सभा होणार आहे. पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. 

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. 17) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेतर्फे उमेदवाराचे नाव लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे तसेच तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित राहतील. वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या :

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tense atmosphere on the Maval battlefield of lok sabha election 2019