Loksabha 2019 : शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे : ''शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही. विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी मी आज सकाळी चर्चा केली. सर्वांची समजूत काढली आहे. काही कार्यकर्त्यांनी सकाळी फलक लावल्याचे समजल्यानंतर चर्चा झाली. आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले आहेत. याची प्रचिती शिरूरसाठी होणाऱ्या प्रचारात दिसून येईल'' असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाल्हेकरवाडी येथे प्रचार सभेची जागा पाहणी केल्यानंतर 'सकाळ'शी बोलताना सांगितले

राष्ट्रवादीकडून शिरुर मतदार संघा डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिरुर मतदारसंघात उभे होते. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राष्टवादीकडून शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे विलास लांडे यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे शिरुर मतदा संघात कोल्हेंविरोधात बॅनरबाजी करुन नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार अशी भूमिका लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न लांडे यांनी केला. 

या प्रकारावरुन राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असल्याची चर्चा सुरु होती. याचा फायदा विरोधी पक्षांना नक्कीच होऊ शकतो. याबाबत अजित पवार यांनी विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन सर्वांची समजूत घातली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली. शरद पवार यांनी, कामाला लागा असा आदेश दिला असून लांडे यांनी देखील ''पक्ष जे काम देईल ते मी करणार'' अशी भुमिका स्पष्ट केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com