Loksabha 2019 : मावळ तालुक्यात तीन हजार नवमतदार

Loksabha 2019 : मावळ तालुक्यात तीन हजार नवमतदार

वडगाव मावळ - मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत नावे समाविष्ट  करण्यासाठी महिनाभरात तीन हजार अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत (ता. ३०) अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक नायब  तहसीलदार रंगराव कांबळे यांनी दिली.

गेल्या ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार तालुक्‍यात एक लाख ७१ हजार ९८९ पुरुष व एक लाख साठ हजार १२३ महिला असे तीन लाख ३२ हजार ११२ मतदार आहेत. त्यानंतर राबविलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमात नव्याने तीन हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यात नवीन नावे सामाविष्ट करणे, नावात व पत्त्यात दुरुस्ती, फोटो ओळखपत्र, स्थलांतरित मतदार या घटकांचा समावेश आहे. या अर्जांवर निर्णय घेऊन ३० तारखेपर्यंत अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे.

मावळातील मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार ६८० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांना मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षणही दिले आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सुभाष भागडे व तहसीलदार रणजित देसाई यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com