Election Result : बारामती मतदार संघात सुळे आणि कुल यांच्यात चुरशीची लढत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत.

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना दिसत आहे.
 

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची वाटचाल वेगाने विजयाच्या दिशेने असली तरी त्यांची आघाडी गेल्या निवडणूकीपेक्षा अधिक असेल की आघाडी कमी होईल या बाबत आता उत्सुकतेचे वातावरण आहे. कांचन कुल यांनी सुळे यांना सर्वच ठिकाणी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tough fight between Sule and Kul In the Baramati Constituency