Loksabha 2019 : 'मन की बात करणाऱ्या मोदींच्या मनात धन की बात'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

मावळमधील राष्ट्रवादीचेे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारसभेेेत उदयनराजेे बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी यांच्या मनात केवळ धन की बात असल्याचे वक्तव्य केले.

लोकसभा 2019
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांपासून मन की बात करत होते. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या मनात धन की बात होती. त्यांचे सरकार बिझनेस इंडिया कंपनी असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये केली. 

मावळमधील राष्ट्रवादीचेे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारसभेेेत उदयनराजेे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पार्थ पवार आदी उपस्थित होते. अवकाळी पावसाने ही सभा उशीरा सुुुरु झाली. दोनवेेळा पावसामुुळेे ती थांंबवावी सुद्धा लागली.

उदयनराजे म्हणाले, "मन की बातच्या माध्यमातून भाषणे करत मोदींनी जनतेची फसवणूक केली. देशातील युवकांना दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा केले नाहीत. अच्छे दिनच्या नावाखाली मते मागणाऱ्या या मंडळींना जनतेने बहुमताने निवडून दिले होते. मात्र, लोकसभेत विराजमान होता त्यांनी जनतेकडे पाठ फिरवत तो मी नव्हेच अशी भूमिका घेत केसाने त्यांचा गळा कापला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या मताची किंमत नाही. या सत्ताधाऱ्यांनी देश विकला असून मूठभर लोकांचे खिसे भरण्याचे काम केले आहे. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे देशाची अवस्था सुधारायची असेल तर परिवर्तनाखेरीज गत्यंतर नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale criticised narendra modi at parth pawars public meeting