Loksabha 2019 : 'घर टू घर' अभियानातून युवक काँग्रेस करणार भाजपची पोलखोल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे  : "चलो घर घर अभियाना'च्या माध्यमातून युवक काँग्रेसने मतदारांना पक्षाशी जोडण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला मंगळवारपासून शहरात सुरवात झाली असून युवक काँग्रेसचे सुमारे दोन हजार पदाधिकारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत.
 

पुणे  : "चलो घर घर अभियाना'च्या माध्यमातून युवक काँग्रेसने मतदारांना पक्षाशी जोडण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला मंगळवारपासून शहरात सुरवात झाली असून युवक काँग्रेसचे सुमारे दोन हजार पदाधिकारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत.

गेल्या साठ वर्षांतील काँग्रेसने केलेल्या कामाबरोबरच मोदी सरकारच्या पाच वर्षाचा कामाचा पोलखोल या अभियानाच्या माध्यमातून घरोघर जाऊन करण्यात येणार आहे.  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मलके यावेळी उपस्थित होते. पारंपरिक प्रचारपद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही अभियान राबविण्यात असल्याचे सांगतानाच्या पुण्याच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात युवक काँग्रेसचा मोठा वाटा असणार असल्याचा दावाही तांबे यांनी यावेळी केला. 

तांबे म्हणाले," या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे पदाधिकारी 'घर टू घर' जाणार आहे. तेथे काँग्रेसचा इतिहास, गेल्या साठ वर्षात पक्षाने केलेली कामे, काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर काय योजना राबविणार याबरोबरच मोदी सरकारच्या पाच वर्षातील कामांचा पोलखोल करणार आहे. त्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ऍप तयार करण्यात असून ते सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तर न्याय योजनेची माहिती द्रारिद्र्य रेषेखालील कुटूंबियांपर्यंत पोचविण्यासाठी देखील विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या शिवाय पाच मिनिटे पक्षासाठी हा देखील उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'' 
 

Web Title: Youth Congress campaign 'Home to Home' to expose Bjp