Loksabha 2019 : उमेदवारांच्या मालमत्तांची कोटीची उड्डाणे!

Loksabha 2019 : उमेदवारांच्या मालमत्तांची कोटीची उड्डाणे!

जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या रक्षा खडसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडील कोट्यवधींच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. 

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंकडे वारसाहक्काने प्राप्त मिळकती अधिक असून, त्यांच्यासह मुलगी क्रिषिका व मुलगा गुरुनाथ यांच्या नावावर आलेल्या मालमत्तांचा यात समावेश आहे. रक्षा खडसेंकडे 17 लाख 32 हजारांच्या रोकडसह स्वत: व त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने बॅंक खात्यातील रक्कम, मुदत ठेवी, विविध शेअरमधील गुंतवणूक आणि अन्य जंगम मालमत्तांचे मूल्य दहा कोटींच्या घरात आहे. पैकी रक्षा खडसेंच्या नावे चार कोटी 57 लाख तीन हजार 533, मुलगी क्रिषिकाच्या नावे दोन कोटी 56 लाख 19 हजार 431, तर मुलगा गुरुनाथ याच्या नावावर दोन कोटी 95 लाख 31 हजार 625 रुपयांची मालमत्ता आहे. 

शेतजमिनीसह फ्लॅट, प्लॉट 
यासह पेट्रोलपंप, शेतजमीन, नाशिक व पवईतील फ्लॅट, प्लॉट, अशी वारसाहक्कातून मिळालेली स्थावर मालमत्ता आहे. त्यात रक्षा खडसे यांच्या नावे तीन कोटी नऊ लाख दोन हजार 95, मुलगी क्रिषिकाच्या नावावर दोन कोटी चार लाख 78 हजार 525 रुपये, तर गुरुनाथच्या नावावर दोन कोटी चार लाख 78 हजार 525 रुपयांची मालमत्ता आहे. 
 
देवकरांपेक्षा पत्नी श्रीमंत! 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या नावावर रोकड, ठेवी, गुंतवणूक व स्वरूपात 66 लाख दोन हजार 456 रुपये, तर त्यांच्या पत्नी सौ. छाया यांच्या नावावर 67 लाख 51 हजार 61 रुपयांची मालमत्ता आहे. देवकरांचे द्रौपदीनगरातील "शिवमुद्रा' व रामदास कॉलनीतील "मधुबन' हे दोन्ही निवास त्यांच्या पत्नीच्या नावे आहेत. स्थावर मालमत्तेत देवकरांकडे प्लॉट, शेतजमीन व अन्य मिळकती मिळून 65 लाखांची, तर पत्नी छाया यांच्याकडे तीन कोटी आठ लाखांची मालमत्ता आहे. 

कर्जदार देवकर 
देवकरांवर "एलआयसी'चे 12 लाख 40 हजार व अन्य तीन लाख 60 हजार, असे 16 लाखांचे कर्ज आहे; तर पत्नी छाया देवकर यांच्यावर बॅंक ऑफ बडोद्याचे 13 लाख 41 हजार 210 रुपये, विजया बॅंकेचे 53 लाख 78 हजार 619 रुपये व अन्य दोन लाख 32 हजार 832 रुपये, असे सुमारे 69 लाख 52 हजार 661 रुपयांचे कर्ज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com