Loksabha 2019 : लग्नाच्या साड्यांतून मोदींचा छुपा प्रचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

'मोदी लाओ, देश बचाओ...' अशा आशयाचा संदेश बाजारात विक्रीस असलेल्या साड्यांच्या आवरणाद्वारे ग्राहकांपर्यंत छुप्या पद्धतीने पोचवला जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगासह अन्य यंत्रणांना उघडउघड टोपी घालत हा प्रचार जोरात सुरू आहे. या छुप्या प्रचाराचे थेट कनेक्‍शन टेक्‍स्टाइल उद्योगाचे हब असलेल्या गुजरातशी असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

नाशिक - 'मोदी लाओ, देश बचाओ...' अशा आशयाचा संदेश बाजारात विक्रीस असलेल्या साड्यांच्या आवरणाद्वारे ग्राहकांपर्यंत छुप्या पद्धतीने पोचवला जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगासह अन्य यंत्रणांना उघडउघड टोपी घालत हा प्रचार जोरात सुरू आहे. या छुप्या प्रचाराचे थेट कनेक्‍शन टेक्‍स्टाइल उद्योगाचे हब असलेल्या गुजरातशी असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

एखाद्या वस्तूच्या माध्यमातून प्रचाराची पद्धत सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या साड्यांच्या आवरणावर थेट मोदींना मत देत देशाला वाचवा, असा संदेश आहे. या संदेशासोबत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळदेखील आहे.

आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकला जात असून, हे आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या साड्या गुजरातच्या कापड कंपन्यातून तयार होऊन येतात. या कंपनीत साडीच्या नक्षीची माहिती देणाऱ्या छायाचित्रासोबत हा संदेश छापला जातो. खुल्या बाजारात अशा साड्यांची विक्री सुरू असतानादेखील निवडणूक निर्णय अधिकारी व संपूर्ण यंत्रणेपर्यंत यासंदर्भातील माहिती पोचली नाही का? यासंदर्भात काय कारवाई केली जाईल? असे अनेक प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहेत.

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Marriage Saree Publicity Politics