Election Results : खानदेशी पुत्राचा गुजरातेत डंका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे. देशात  पाटील यांच्यासह ४ उमेदवारांनी ६ लाखांहून अधिक मताधिक्‍याने विजयी होण्याचा मान पटकविला आहे.

सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य
नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे. देशात  पाटील यांच्यासह ४ उमेदवारांनी ६ लाखांहून अधिक मताधिक्‍याने विजयी होण्याचा मान पटकविला आहे.

हरियाना राज्यातील करनाल मतदारसंघातील भाजपचे संजय भाठिया यांनी ६ लाख ५६ हजार १४२, फरिदाबाद मतदारसंघातील भाजपचे कृष्णपाल हे  ६ लाख ३८ हजार २३९ व राजस्थान राज्यातील भीलवाडा मतदारसघातील सुभाषचंद्र बहेरिया ६ लाख १२ हजार मताधिक्‍यांनी निवडून आले आहेत. तसेच देशात ५ लाखांहून अधिक मताधिक्‍य मिळविणाऱ्या उमेदवारांचीही संख्या अधिक आहेत.

यात अमित शहा ५ लाख ५७ हजार, मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद मतदारसंघाचे उमेदवार उदयप्रताप सिंह ५ लाख ५३ हजार ६८२, शंकर लालवानी (इंदूर) ५ लाख ४७ हजार, रमाकांत भार्गव (विदिशा) ५ लाख, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मतदारसंघाचे उमेदवार जनरल व्ही के. सिंह ५ लाख १५ हजार, राजस्थानमधील चितोड मतदारसंघाचे चंद्रप्रकाश जोशी ५ लाख ७६ हजार ८९७, राजसमंद मतदारसंघातील दिया कुमारी ५ लाख, दिल्लीतील दिल्ली वायव्य मतदारसंघातील हंसराज हंस ५ लाख ५३ हजार ८९७, पश्‍चिम (दिल्ली) प्रवेश साहेबसिंह वर्मा हे ५ लाख ७८ हजार ४८६, तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल मतदारसंघातील द्रमुकचे वेलूस्वामी ५ लाख ३८ हजार ९७२, श्रीपेरुंबदुर मतदारसंघातील टी. आर. बालू ५ लाख ७ हजार ९५५ च्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results C R Patil Win Topper Gujrat Politics