Loksabha 2019: रावेरचा तिढा अखेर सुटला; काँग्रेसकडून उमेदवार निश्चित

Loksabha 2019: रावेरचा तिढा अखेर सुटला; काँग्रेसकडून उमेदवार निश्चित

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाचा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जागा लढविण्याचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदार संघ कॉंग्रेसला देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील फेसबुकच्या माध्यमातून केली. 

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांनीही वरीष्ठाकडून जागा कॉंग्रेसला सुटल्याचा दुजोरा दिला असून माजी खासदार उल्हास पाटील हेच उमेदवार असतील असेही त्यांनी सांगितले. 

रावेर लोकसभा मतदार संघात उमेदवारी करण्याबाबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तिढा निर्माण झाला होता. कॉंग्रेसने या मतदार संघाची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस ही जागा लढविण्याची तयारी करीत होते. प्रारंभी त्यांनी अरूणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी,यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे अखेर उमेदवाराचा शोध करून माजी खासदार व पक्षाचे नेते ईश्‍वरलाल जैन यांनी रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी भेट घालून दिली. मात्र त्यानंतर पाटील यांनीच नकार दिला. त्यानंतर शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा विचार झाला मात्र त्यांनीही नकार दिला. अखेर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार होता. मात्र दुसरीकडे कॉंग्रेसने या जागेची मागणी कायम ठेवली. 

अखेर आज मुंबईत चर्चा होवून ही जागा कॉंग्रेसला देण्याचा अंतीम निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची अंतीम घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत लवकरच फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे म्हणणे आहे. या लोकसभेच्या बदल्यात जामनेर आणि अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे देण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

याबाबत जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रावेरची जागा कॉंग्रेसला एक्‍स्ट्रॉ म्हणून देण्यात आल्याचे पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले आहे. त्याच्या बदल्यात कोणत्याही जागेची आदलाबदल नसल्याचेही त्यांनी सांगितले. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे आमचे उमेदवार असून आम्ही जोमाने ही जागा लढवू असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com