Loksabha 2019 : 'अच्छे दिनमुळे पाच वर्षात तरूण सोयरिकीला देखील मुकले' - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

  • निफाड येथील सभेतून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल
  • 'भाजपने पाच वर्षात सबंध शेतकरी जात उद्ध्वस्त केली'
  • 'मोदी साहेब आमच्या घराचं सोडा हो, तुमच्या यशोदाबेनचं काय झालं तेवढे सांगा'

लोकसभा 2019
निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दिन येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील मिळाली नाही,' असा हल्लाबोल विरोधी पक्ष धनंजय मुंडे बेरोजगारीच्या प्रश्‍नावर बोलताना सायखेडा येथे केला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपाई व संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 26 ला सायंकाळी 4 वाजता सायखेडा तालुका निफाड येथील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे बोलत होते. या प्रचार सभेचे व्यासपीठावर ती माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, हंसराज वडघुले, श्रीराम शेटे, जि प सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, मंदाकिनी बनकर, तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, मधुकर शेलार, गणेश बनकर, विक्रम रंधवे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, रमेश चन्द्र घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडे म्हणाले की, 'देशाचा निवडणुकीत मतदान करताना चुकलो तर संपूर्ण देशाचे वाटोळे होते. वर्षापूर्वीची निवडणूक आठवते, पाच वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं पण खरंच आज अच्छे दिन आले का? पंधरा लाखाच्या नावाने देशाला फसवलं. प्रत्यक्ष पंधरा पैसेदेखील कुणाच्या खात्यावर आले नाही. पाच वर्षांपूर्वी पावणे चारशे रुपयाला गॅसची टाकी मिळायची, त्यावेळी हेच भाजपाचे बांडगुळ महागाई वाढल्याचे म्हणायचे. तर पाच वर्षात सबंध शेतकरी जात उद्ध्वस्त केली आहे. शेतकरी जिरायती असो की बागायती त्याचा उत्पादन खर्च देखील सुटू शकला नाही. आज कांदा उत्पादकाला प्रति क्विंटल दोन हजार भाव मिळाला पाहिजे. मात्र दुर्दैवाने शेतकरी कांद्याला भाव नसल्याने रस्त्यावर फेकून देत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या जातीची घोर फसवणूक केली आहे. राज्यातील देवेंद्र फडवणीस सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री पिस्तूल राव महाजन मोदी जेटलींवर आणि कोणत्या अंगाने शेतकरी दिसतात, असा सवाल करताना मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. तर 1 एप्रिल ला वर्धा येथे झालेल्या सभेत देशातील सर्वात मोठे फेकू नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आल्यावर आपल्या सरकारच्या कामकाजाबद्दल महाराष्ट्रातल्या दुष्काळाबद्दल काहीतरी बोलतील, याची अपेक्षा असताना त्यांनी पवार साहेबांवर टिका केली. आजही देशातील कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांचा ओळखतात मोदींचे भाषण ऐकल्यावर त्यांना विस्पर नावाचा रोग झाला आहे. देशातील पंतप्रधानाची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाली असून देशाचा प्रधानमंत्री एका महान नेत्याबद्दल त्यांच्या घराबद्दल करतो. परंतु मोदी साहेब आमच्या घराचं सोडा हो तुमच्या यशोदाबेनचं काय झालं तेवढे सांगा,' असा टोला लगावला.

यावेळी मुंडे म्हणाले की, 'तुम्ही म्हणाला होता अच्छे दिन येतील, अच्छे दिन कुठे आहे? ते पंधरा लाख कुठे आहे? ते दोन करोड रोजगार कुठे आहे? ती कर्जमाफी कुठे आहे? ते काळे धन आणि मोदी साहेब चौकीदार चोर कसा झाला? ते पण सांगा नोटबंदीचं काय झालं? ते पण सांगा मोदी साहेब नोटबंदीनंतर 150 लोक लाईनमध्ये मेले? पाच वर्षात देशाचा विकासाचा काम केलं नाही, म्हणून तुम्ही पुलवामाच्या घटनेवर त्यांच्या नावावर मते मागत आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील शहीदांच्या नावावर मते मागितली नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घ्या आणि मग त्यांच्या नावाने मते मागा, अशा भाषणाने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचा मुंडे यांनी समाचार घेतला.

तर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना सत्तेसाठी फडणवीस यांनी सातबारा करण्याची भाषा करतात आम्ही कांदा ऊस सोयाबीन धान उत्पादकाची व्यथा सभागृहात मांडली उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मी पाच पिढ्यांचा शेतकरी आहे. फक्त खाली बसून दार काढता येत नाही. परंतु येत्या अधिवेशनात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ती कोरडवाहू ला 50000 तर बागायतीला एक लाखाची मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. यावरून सरकारला सळो की पळो करून सोडणारी आहे. या सरकारने कर्जमाफी च्या नावावर फसवणूक केली आहे. आज काल या लबाडांची तरफदारी करणारे लावारिस मोदी भक्त गावागावात भेटत आहे. यंदा जर कदाचित मोदी सरकार आले. तर अचानक सायंकाळी 8 च्या सुमारास मोदी येथील आणि म्हणतील मित्र देशातील निवडणुका आजपासून बंद होत आहे. तुमचे एक मत लोकशाहीसाठी आहे ते जर चुकलं तर हुकूमशाहीसाठी जाईल. जो त्रास पाच वर्षात तुम्ही सण केला त्याचा राग 29 तारखेला मतदानातून व्यक्त करा, असे शेवटी मुंडे म्हणाले.

यावेळी माजी आमदार दिलीप बनकर हे आपल्या भाषणात म्हणाले की, 'निफाड दिंडोरी आणि परिसरातील शेतमाल निर्यात होऊ शकला नाही. नोटबंदी ने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. गेली दहा वर्षात सत्ता नसताना पक्ष येथे कार्य करत आहे. आमचे सरकार असताना 68 कोटीच्या नांदूरमदमेश्वर धरणाच्या गेटमुळे गोदाकाठची पूर परिस्थिती आटोक्यात आली. पवार साहेबांच्या माध्यमातून तसेच छगन भुजबळ यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचा रथ असे सांगितले आणला. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी नगरसेवक देवदत्त कापसे, भूषण शिंदे, राकेश गणपत हाडपे, सुधाकर मोगल, निवृत्ती धनवटे, नंदू सांगळे, राजेंद्र सांगळे, भाऊलाल कुटे, अश्विनी मोगल, कल्याणी राजोळे, बंटी शिंदे, विजय धारराव आदींसह काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीचे कार्यकर्ते सभेसाठी उपस्थित होते. 

niphad

 

Web Title: Opposition leader Dhananjay Munde criticized the BJP in Niphads meeting