Loksabha 2019: राहुल गांधींची 26 एप्रिलला सिन्नरऐवजी संगमनेरमध्ये सभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची 26 एप्रिलला सायंकाळी सहाला संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे. सिन्नरमधील नियोजित सभेच्या सुरक्षेच्या कारणास्तव स्थळात बदल करण्यात आला आहे.

नाशिक : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची 26 एप्रिलला सायंकाळी सहाला संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे. सिन्नरमधील नियोजित सभेच्या सुरक्षेच्या कारणास्तव स्थळात बदल करण्यात आला आहे.

सिन्नरमधील आडवा फाटा भागात सुरक्षा विभागाने पाहणी केली. त्यावेळी मैदानावरील विजेच्या तारा, उंच इमारती हा प्रश्न पुढे आला. तसेच ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टर ने नेल्यावर हेलिकॉप्टर लँडिंगचा प्रश्न तयार झाला. त्यावर उपाय म्हणून ओझर ते सिन्नर रस्त्याच्या प्रवासात बंदोबस्ताचा विचार झाला, त्यामुळे अखेर संगमनेरला सभा घेण्याचे ठरल्याची माहिती महाआघाडीच्या नेत्यांनी दिली.

संगमनेरला तपासणी
संगमनेर येथील राहुल यांच्या सभेच्या स्थळाची पाहणी आणि तपासणी सुरक्षा विभागाने केली. त्यानंतर सायंकाळी हे स्थळ सभेसाठी निश्चित झाल्याची माहिती काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आली. ही सभा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ आणि शिर्डीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhis Rally in Sangamner on April 26