Loksabha Results : ...तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकणार भाजपचा 'हा' उमेदवार

Loksabha Results : ...तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकणार भाजपचा 'हा' उमेदवार

लोकसभा निकाल 2019 :
पुणे : जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अर्थात, 23 एप्रिलला मतदान झाले. रावेरची लढत एकतर्फी वाटत होती आणि निकालाच्या दिवशीही तसेच चित्र स्पष्ट दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या राज्यातील सर्वात जास्त मताधिक्य घेऊन विजयी होण्याची शक्यता आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे यांना एकूण 265701 मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. उल्हास पाटील यांना 142300 मते पडली आहेत. म्हणजेच रक्षा खडसे एकूण 126315 मतांनी पुढे आहेत. म्हणूनच अंतिम निकाल आल्यास रक्षा खडसे या महाराष्ट्रातून सार्वाधिक मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे.

दरम्यान एकनाथ खडसेंच्या स्नुषा व विद्यमान खासदार रक्षा खडसे या मतदारसंघात आधीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. लोकसभेच्या प्रमुख लढतीत रावेरच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंच्या विरोधात ऐनवेळी कॉंग्रेसकडे मतदारसंघ गेल्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटलांनी आव्हान उभे केले. मात्र निकालाच्या दिवशी खडसेंचा विजय हा एकतर्फी असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com