Loksabha 2019 : जळगावात शिवसेना भाजपचे काम करणार नाही

Loksabha 2019 : जळगावात शिवसेना भाजपचे काम करणार नाही

धरणगाव - शिवसेनेचे उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर भाजप कार्यकर्ते खोटे आरोप करीत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत, असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. 

धरणगाव येथे मंगळवारी (ता. १२) शिवसेना कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर रोष व्यक्त केला. भाजपतर्फे शिवसेनेचे उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते खोटे आरोप करीत आहेत, तसेच युती धर्म पाळत नाहीत, शिवाय जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार निष्क्रिय आहेत, ते कधी मतदार संघात फिरकलेच नाहीत, अशा विविध कारणांमुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे यांच्यासमोर रोष व्यक्त केला. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांचा रोष पाहून लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक भाजपचे काम करणार नाही, असा ठराव मांडला. या ठरावाला सूचक म्हणून शहरप्रमुख राजेंद्र महाजन आहेत. तर  गटनेते पप्पू भावे यांनी अनुमोदन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com