Loksabha 2019 : जयदीप कवाडेंवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नागपूर - केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती ईराणी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पीपल्स रीपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्या विरोधात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कुंभारपुरा बगडगंज येथे सोमवारी (ता. 1) कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची प्रचारसभा झाली. त्यात कवाडे यांनी स्मृती इराणी व सर्व महिलांबाबतच आक्षेपार्ह विधान केले. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लकडगंज पोलिस ठाण्याला दिलेल्या पत्रात नायब तहसीलदार योगीता यादव यांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास प्राधिकृत केले असल्याचे म्हटले आहे. कवाडे यांच्यासह इतरही कुणी या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांना विचारणा केली असता, "कवाडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधातील तक्रार मंगळवारी (ता. 2) मिळाली. या प्रकरणी कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना आज दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Assistant Returning Officer has filed a case against People's Republican Party leader Jaideep Kawade