Loksabha 2019: फडणवीसांनी पैशाबरोबरच भाजपत येण्याची ऑफर दिली- ठाकूर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

- देवेंद्र फडणवीस यांनी पैशाची ऑफर दिली
- भाजपत येण्याचे आवाहनही केले होते
- तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा थेट आरोप

अमरावती : परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून पैशाची ऑफर देण्याबरोबरच भाजपत येण्याचे आवाहन केले होते असा खळबळजनक गौप्यस्फोट कॉंग्रेसच्या नेत्या आणि तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पुरोगामी महाआघाडीच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, की आम्ही कॉंग्रेसच्या विचार धारेवर चालणारे लोक आहोत, परवा मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून पैशाची ऑफरही देतानाच भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. परंतु पैसे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत, विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी भाजपत कदापी जाऊ शकत नाही.

माझ्या वडीलांनी जमीनी विकून राजकारण केले आहे. संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेमहाराज यांच्या विचारधारेवर आम्ही चालतो. त्यामुळे आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. विचारधारा महत्त्वाची आहे.

 

Web Title: Devendra Fadanvis offers Yashomati Thakur to join Bjp