Loksabha 2019 : देशाच्या व शेतकऱ्यांच्या हिताची बाजू मांडण्यासाठी वंचितांना निवडून द्या : गोपीचंद पडळकर 

दावल इनामदार
गुरुवार, 11 एप्रिल 2019

आज संघर्ष करा, उद्याचा मंगळवेढाही आमदार वंचित आघाडीचा असेल व वंचिताना विचारल्याशिवाय राज्यात कोणीही आमदार होऊ शकत नाही, अशी ही वंचिताची आघाडी बाळासाहेबांनी केली आहे. - गोपीचंद पडळकर

लोकसभा 2019
ब्रह्मपुरी : 'गावगाडयांचे जुने विचार बाजूला ठेऊन नवीन विचार वंचित आघाडीला द्या. लोकसभेच्या या निवडणूकीत वंचित आघाडीला कुठला धर्म व जात नाही. तेव्हा वंचित आघाडीचा खासदार शेतकऱ्यांच्या व देशाच्या हिताची बाजू मांडण्यासाठी लोकसभेत पाठवून द्या,' असे मत गोपीचंद पडळकर यांनी केले.

मंगळवेढा येथे आठवडा बाजार मैदानात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रा. दत्तात्रय खड़तरे यांनी मनोगत व्यक्त केले. भारीप जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. धम्मपाल माशाळकर, अॅड. अरुण जाधव, जिल्हा महासचिव श्रीशैल गायकवाड, नाना कदम, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत गायकवाड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा. महादेव ढोणे, महासचिव अशोक माने, सत्यवान सोनवले, अनिल सोनवले, ध्यानेश्वर गरंडे, अशोक सोनावणे, अमित भुइगळ, दामाजी सरगर, अनंता वाघमारे, संजय वाघमोडे, विकास दुधाल, अंकुश जानकर, शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे, युवक तालुकाध्यक्ष सुनिल शिंदे, युवक शहराध्यक्ष अशोक जाधव, महासचिव संजय सरवदे, सुनील वाघमारे, अमिर काझी, महिलाअध्यक्ष वैशाली सावंत, वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष उषा चव्हाण, तालुका महासचिव निकिंता सोनवने, उपाध्यक्ष लक्ष्मी ससाने आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की, 'ही निवडणूक विचाराची आहे सर्व बहुजन वंचितानी अड़ बाळासाहेबाचे साथ देऊन संसदेत पाठवा आजपर्यंत आपण सर्वांनी  हालगी वाजवायाची, फटाके उडवायाचे, झेंडे लावायाची, सतरंजी उचलायाची अशी अनेक कामे निवडणुकीत करत आलो आहे. परंतू यावेळीस सतरंजी आपणच हतारायची व आपणच बसायचं ही भूमिका वंचिताची असेल. आज संघर्ष करा, उद्याचा मंगळवेढाही आमदार वंचित आघाडीचा असेल व वंचिताना विचारल्याशिवाय राज्यात कोणीही आमदार होऊ शकत नाही, अशी ही वंचिताची आघाडी बाळासाहेबांनी केली आहे.'

यावेळी सूत्रसंचालन अॅड. अरुण जाधव यांनी तर आभार प्रा. महादेव ढोने यांनी केले. 

 

Web Title: To favor the interest of the country and the farmers select the vanchit bahujan aghadi