Loksabha 2019 : भाजपचा ‘वजीर ए आला’ गेला पाहिजे - चव्‍हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

स्वतः देशाचा वजीर ए आला समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी एकजूट होऊन सत्तेतून घालवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना केले.

नागपूर - स्वतः देशाचा वजीर ए आला समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी एकजूट होऊन सत्तेतून घालवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना केले.

नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी सोमवारी चव्हाण यांनी कुंभार टोली व भालदारपुरा येथे दोन जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्ष आणीबाणी लावल्याचे सांगून प्रसारमाध्यमांपासून तर सर्वांचीच मुस्कटबादी सुरू केल्याचा आरोप केला. पत्रकारांना, लेखकांना लिहिण्याचे स्वातंत्र्य नाही. सरकारच्या विरोधात लिहिण्याची हिंमत केली तर त्याला अप्रत्यक्षरीत्या धमकावल्या जाते. ते कसे खोटे आहे यासाठी खटाटोप केला जातो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हायकोर्ट खडसावतात. याचीही दखल घेतली जात नाही. मनमानी पद्धतीने केंद्र व राज्य सरकार सत्ता हाकत आहे.

अशा सरकारला उलथवून फेकण्याची वेळ आली आहे. यासाठी काँग्रेस व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, ‘आता वजीर ए आला गेला पाहिजे’ असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे, अनिल देशमुख, अनिस अहमद, शेख हुसेन यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Loksabha Election 2019 BJP Narendra Modi Ashok Chavan Politics