Loksabha 2019 : वासनिक यांच्यासाठी समर्थकांचे साकडे

Mukul-Wasnik
Mukul-Wasnik

नागपूर - पूर्व विदर्भातील चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा कॉंग्रेसचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी अत्यल्प कालावधी राहिलेला आहे. रामटेकमधून भाजप-शिवसेना युतीचे कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. अशात कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी रामटेकमधून वासनिक यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. तसे निवेदनही राहुल गांधींना दिल्याची माहिती येथील प्रेस क्‍लबमध्ये शुक्रवारी देण्यात आली.

निवडणूक जवळ आहे आणि वेळ कमी आहे. अशा परिस्थितीत इतर कुणाला उमेदवारी दिल्यास निवडणूक हरण्याचीच शक्‍यता जास्त आहे, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव मुजीब पठाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. मुकुल वासनिक यांचा दीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि कार्यशैलीमुळे रामटेकमध्ये पक्षाचा विजय सोपा होईल. त्यामुळे त्यांनाच रामटेकमधून लढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com