Loksabha 2019 : गडकरी, पटोले कोट्यधीश

Nitin-Gadkari-and-Nana-Patole
Nitin-Gadkari-and-Nana-Patole

नागपूर - नागपूर लोकसभा निवडणुकीत ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले दोघेही कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे दोघांचाही मुख्य व्यवसाय शेती आहे. उमेदवारी अर्जासोबत दोघांनी सादर केलेल्या उत्पन्नाच्या शपथ पत्रात माहिती दिली आहे.

नाना पटोलेंकडे ६८ लाखांची जंगम मालमत्ता
नाना पटोले यांच्याकडेही कोटीच्या घरात मालमत्ता आहे. पटोले यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार ६८ लाख ७१ हजारांची जंगम मालमत्ता असून, पत्नीकडे २६ लाख ३४ हजारांची मालमत्ता आहे. कुटुंबाच्या नावे चार लाख ११ हजारांची मालमत्ता आहे. यात पटोलेंकडे तीन लाख ६९ हजार रोख आहे. पत्नीकडे ३१ हजार रुपये आहेत. नाना पटोलेंकडे तीन लाख तर पत्नीकडे साडेचार लाखांचे सोने, चांदीचे दागिने आहेत. नाना पटोलेंकडे ४१  लाख ७५ हजारांची स्थावर मालमत्ता असून, पत्नीच्या नावे ४१ लाखांची मालमत्ता आहे. नाना पटोलेंवर चार गुन्हे प्रलंबित आहेत.

नितीन गडकरी यांच्याकडे १८ कोटींची मालमत्ता
नितीन गडकरी यांच्याकडे १८ कोटींची मालमत्ता आहे. त्यात ६९ लाख ३८ हजारांची जंगम मालमत्ता आहे. पत्नीकडे ९१ लाख ९९ हजारांची मालमत्ता आहे. कुटुंबाकडे ६६ लाख सात हजार रुपये असल्याचे दर्शवले आहे. यात गडकरींकडे १० हजार ७५० रोख तर पत्नीकडे १८ हजार ५०० रुपये रोख आहे.

कुटुंबाजवळ २५ हजार रुपये आहेत. नितीन गडकरी यांच्या  विविध बॅंक खात्यात आठ लाख ९९ हजार तर पत्नीच्या खात्यात ११ लाख सात हजार रुपये आहेत. ३५ लाखांत विविध ठिकाणचे शेअर खरेदी केले आहे. पत्नीच्या नावे १० लाखांचे शेअर दर्शवले आहे. १४ लाख ८० हजारांची गुंतवणूक गडकरी यांनी तर पत्नीच्या नावे २३ लाख ३३ हजारांची गुंतवणूक दर्शवली आहे.

गडकरींकडे २१ लाख ८२ हजारांचे सोने तर पत्नीकडे ९१ लाख ९९ हजारांचे सोने आहे. त्याचप्रमाणे गडकरींकडे चार कोटी २५ लाखांची स्थावर मालमत्ता तर पत्नीकडे चार कोटी ४० लाखांची मालमत्ता असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. कुटुंबाच्या नावे सात कोटी ८५ लाखांची मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. गडकरी यांच्यावर एक कोटी ५७ लाखांचे कर्ज असून, पत्नीच्या नावे पाच लाखांचे कर्ज आहे. कुटुंबाच्या नावे दोन कोटी २ कोटी ४५ लाखांचे कर्ज असल्याचे नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com