जनतेला कसे तोंड दाखवू - आठवले

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

नागपूर - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेत युती झाली, हे उत्तम आहे. आरपीआय (आठवले गट) महायुतीचा घटक पक्ष आहे. युती करताना आम्हाला विचारात घ्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. जनतेत तोंड दाखविण्यासाठी जागा द्यायला हवी होती. मात्र, एकही जागा आमच्या पक्षाला न सोडल्याने आता समाजाला कसे तोंड दाखवायचे, कोणत्या तोंडाने मते मागायची, अशी व्यथा आरपीआय आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

नाट्य संमेलनासाठी शहरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप-सेनेत युती व्हावी, अशी आपली सुरुवातीपासूनच इच्छा होती. ती झाली त्याचा आनंद आहे. लोकसभेमध्ये आम्हाला किमान एक जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मी दक्षिण-मध्य मुंबई येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांशी दोन-तीनदा चर्चा झाली. परंतु, तसे झाले नाही.

देशभरातील कार्यकर्ते व लोक मला विचारत आहेत. त्यांना काय उत्तर देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्‍न नाही. मात्र, राजकारणात सर्व मार्ग मोकळे असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
२५ फेब्रुवारीला कार्यकर्त्यांची बैठक आहे. यात पुढील दिशा निश्‍चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांची भेट घेतली नाही. भेट घ्यायचीच झाली तर उघडपणे घेणार. छगन भुजबळ यांनी आपल्याला भेटण्याबाबत विचारणा केल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे, विनोद थुल, सतीश तांबे आदी उपस्थित होते.

दलितांनी सीमेवर वीरमरण पत्करावे
पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्‍यक आहे. त्याच्याशी एकदा आर-पारची लढाई झालीच पाहिजे. नरेंद्र मोदी त्यासाठी गंभीर आहेत. क्रिकेट सामनेही भारत खेळता कामा नये. दलितांनी आजारी पडून मरण्यापेक्षा सीमेवर वीरमरण पत्करावे. दलितांना सैन्यात सामील होण्यासाठी आवाहन केले आहे. सैन्यात आरक्षण लागू करावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com