Loksabha 2019 : ‘काँग्रेसप्रमाणेच भाजपही भ्रष्टाचारी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. त्यास संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून, काँग्रेसने बोफोर्सखरेदीत; तर भाजपच्या काळात राफेलखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली. 

नागपूर - काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. त्यास संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून, काँग्रेसने बोफोर्सखरेदीत; तर भाजपच्या काळात राफेलखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली. 

कस्तुरचंद पार्क मैदानावर बसपच्या विदर्भातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर बसपचे राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्रा, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी आदी उपस्थित होते. 

मायावती म्हणाल्या की, मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी १५ लाख रुपयांचे आश्‍वासन दिले. परंतु, यासह कुठलेही आश्‍वासन पूर्ण केले नाही. एवढेच नव्हे, तर निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी अर्धवट कामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुलवामा हल्ल्यानंतरही सुरू होता. यातूनच त्यांच्या देशभक्तीचा बुरखाही फाटल्याचे दिसते.

Web Title: Mayawati criticized Like Congress BJP is also corrupt in nagpur