Loksabha 2019 : 'नागपुरात विकासापेक्षा घोटाळेच जास्त झाले'

Loksabha 2019 : 'नागपुरात विकासापेक्षा घोटाळेच जास्त झाले'

नागपूर - गुजरातचे नरेंद्र मोदी वाराणसीतून लढतात ते चालतं. मी तर महाराष्ट्रातच लढत आहे. माझे घर व मतदान नागपुरात आहे. मुलेही येथेच शिकतात, असे नमुद करीत माजी खासदार नाना पटोले यांनी बाहेरील उमेदवार असल्याचा कांगावा करणाऱ्यांना टोमणा हाणला. नागपुरात विकासापेक्षा घोटाळेच जास्त झाले आहे. येत्या काळात ते पुढे आणणार असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी निवडणुकीत आक्रमकतेचे संकेत दिले आहे.

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी शनिवारी सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्‍लबमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेतून प्रतिस्पर्धी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आदर असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी त्यांनी महापालिकेची स्वायतत्ता संपुष्टात आणल्याचा आरोप करीत त्यांना लक्ष्‍यही केले. नागपुरात सत्तर-एेंशी हजार कोटींची कोणती कामे केली? या कामामुळे नागपूरकरांवर किती कर्ज लादले? याचा हिशेबही त्यांनी मागितला. खैरलांजी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्‍ती त्यांनी दिली. याबाबत विधानसभेतील भाषणाचे इतिवृत्त तपासून घ्यावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. पत्रकारपरिषदेत शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, ॲड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत पवार व अतुल लोंढे होते.

प्रियांका गांधींची एप्रिलमध्ये सभा
चार किंवा सहा एप्रिलला प्रियांका गांधी येणार आहे. याशिवाय अनेक दिग्गज नेते प्रचाराला येणार आहेत. काही नेते स्वतःहून सरकारविरोधात सभा घेतील, असेही पटोले यांनी सांगितले.

नेत्यांवर ‘वॉच’
शहरातील काँग्रेस नेते कुठे जातात व कुणाला भेटतात यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसचे एक पथक येणार असल्याचे शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. पक्षातील संशयास्पद नेत्यांची यादीच तयार केल्याचे त्यांनी नमुद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com