Loksabha 2019: विदर्भातील 10 पैकी 10 जागा जिंकणार : फडणवीस 

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

- 2014 मध्येही वर्ध्यात सभा घेतली होती आणि गांधींजींचे स्वप्न पूर्ण
- गांधीजींनी म्हटले होते, काँग्रेसचे विसर्जन करा
- लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि ग्रामपंचायतीत काँग्रेस पूर्ण साफ
- विदर्भातील दहा पैकी दहा जागा आम्ही जिंकू

वर्धा : 2014 मध्येही वर्ध्यात सभा घेतली होती आणि गांधींजींचे स्वप्न पूर्ण झाले. गांधीजींनी म्हटले होते, काँग्रेसचे विसर्जन करा. लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि ग्रामपंचायतीत काँग्रेस साफ झाले. या निवडणुकीत विदर्भातील दहा पैकी दहा जागा आम्ही जिंकू. विदर्भाच्या सुपूत्रांना संधी दिल्याबद्दल मोदींचे आभार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

वर्ध्यात आज (सोमवार) भाजप-शिवसेना युतीचा प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की 42 डिग्री तापमान असतानाही देशाच्या प्रधान चौकीदारांचे स्वागत करण्यासाठी गर्दी जमली आहे.  विदर्भात अनेक विकासाची कामे आणली. गेल्या चार वर्षात आम्ही विदर्भासाठी खूप काही दिले. वर्ध्याला 498 कोटीची कर्जमाफी केली. एका पक्षाने देशाला 50 वर्षे एप्रिल फूल बनविले. पण, जनता भाजपच्या पाठिशी आहे. विरोधकांनी 56 पक्ष एकत्र आणले आमच्याविरोधात लढायला. पण, देश चालवायला 56 पक्ष नाही तर 56 इंच छाती आहे. आता लोकांना एप्रिल फूल बनवू शकत नाही.

Web Title: We Will win All Loksabha Seats of Vidarbha Says Devendra Fadnavis