Loksabha 2019 : यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी सरासरी 26 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रमुख उमेदवार शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, प्रहारच्या वैशाली येडे, भाजपचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार परशराम आडे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा 2019
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 26.09 टक्के मतदान झाले. उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता 2014 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रमुख उमेदवार शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, प्रहारच्या वैशाली येडे, भाजपचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार परशराम आडे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय पालकमंत्री मदन येरावार यांनीही सपत्नीक मतदान केले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात 24 उमेवार आहेत. त्यांना 19 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यांचे भाग्य आज बॅलेट बंद होण्यास सुरवात झाली आहे. सकाळी सात वाजता पासून मतदानाला सुरवात झाली. जिल्ह्याचा पारा 42.5 अंशावर पोहोचला आहे. वाढते तापमान पाहता ग्रामीण व शहरी भागात सकाळच्या सुमारास मतदान केंद्रावर बर्‍यापैकी मतदारांची गर्दी होती. दुपारी बारानंतर अनेक मतदान केंद्रावर शांतता आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 5.03 होती. 11 वाजेपर्यंत टक्केवारी 12.06 वर पोहोचली. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी तब्बल 26.09 वर पोहाचेली आहे. 
 

Web Title: Yavatmal Washim 26 percent voting for the Lok Sabha election