Loksabha 2019 : राज्यात 112 कोटींचा मुद्देमाल जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून जप्त केला मुद्देमाल

मुंबई : लोकसभेसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने राज्यभर विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून, तपासणीतून 112 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या "हेराफेरी'ला लगाम लागवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. दहा मार्च 2019 पासून महिनाभराच्या कालावधीत या पथकाने राज्यातून 112 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात 40.81 कोटी रुपयांची रोकड, 44.76 कोटी रुपयांची सोने-चांदी, 21.24 कोटी रुपयांची दारू, तर 6.12 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. हा पैसे कुठून कुठे जात होता, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही.

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची यावर नजर आहे. 

Web Title: 112 crore worth of money seized in the Maharashtra