Loksabha 2019 : 28 वर्षीय तेजस्वी सूर्य बंगळूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार

tejasvi-surya
tejasvi-surya

बंगळूर - दक्षिण बंगळूरमध्ये 28 वर्षीय तेजस्वी सूर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी सूर्य कर्नाटक उच्च न्यायालयात वकील आहेत, आरएसएस स्वयंसेवक, राज्य युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि भाजपाच्या राष्ट्रीय सोशल मीडिया संघाचाही एक भाग आहेत.

भाजपचे माजी नेते अनंत कुमार हे सहा वेळा याच जागेवर निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात ही जागा त्यांच्या पत्नी तेजस्विनी अनंत कुमार यांना देण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु, भाजपच्या सुरुवातीच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने ही जागा कोणाला देण्यात येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर तेजस्वी सूर्य यांच्या नावानर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

याआधी अनंत कुमार यांच्या पत्नी यांनी ट्विट करुन पार्टीच्या निर्णयाबाबत आपण वाट बघत असल्याचे म्हटले होते. परंतु, आता लवकर भाजपकडून अधिकृतपणे 28 वर्षीय तेजस्वी सूर्य यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com