Baramati Loksabha 2019 : सुळे-कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क!

| Tuesday, 23 April 2019

बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 31.41 टक्के मतदान झाले. 

बारामती : बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.75 टक्के मतदान झाले. 

 

दुपारी चारपर्यंत बारामती - 48.40, भोर -41.39, दौंड - 39.95, इंदापूर - 38.87, खडकवासला - 41.05, पुरंदर - 40.60 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले. 

बारामतीच्या विद्यमान खासदार व आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यामुळे बारामतीची लढत 'काँटे की टक्कर' होणार आहे. सुळे व पवार परिवाराने बारामतीत, तर कुल परिवाराने दौंडमध्ये मतदानाचा हक्क बजावला.