Loksabha 2019 : कोल्हापूर ऐवजी पाटलांचे बारामतीकडे लक्ष : अजित पवार

मिलिंद संगई
सोमवार, 8 एप्रिल 2019

बारामती - बाहेरचा भाजप सेनेचा कोणीही नेता जर बारामतीत आला तर त्याला पहिल्यांदा विचारा तुमच्या तालुक्यात तुम्ही काय काम केले ते पहिल्यांदा सांगा. अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना देत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. 

श्री क्षेत्र कण्हेरी येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना अजित पवारांनी आज चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये लक्ष घालायचे सोडून बारामतीत येऊन पाटील लक्ष घालत आहेत. कोणी कोठेही येऊ शकते, मला त्या बद्दल काही बोलायचे नाही. पण तुमच्या सुख दुःखात चंद्रकांत पाटील सहभागी होणार नाहीत. निवडणूकीपुरते ते बारामतीत येतील मात्र निवडणूकीनंतर पाटील तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. 

अनेक कारखाने बंद पडले, दुष्काळाची परिस्थिती या तालुक्यात आहे. अनेक अडचणी गेल्या साडेचार वर्षात या सरकारमुळे निर्माण झाल्या आहेत. त्यांची साधी चौकशी तरी पाटील यांनी केली का? महसूलमंत्री असलेले पाटील या बाबत बोलतात का, तुम्ही बिरोबाला येताय मासाळवाडीला जाताय, बारामतीत फिरता का ? तर बारामतीचा विकास आम्ही केला म्हणून बारामतीला महत्व आलय हे विसरु नका, असे पवार म्हणाले.

मला त्यांचा अनादर अजिबात करायचा नाही असे सांगत चंद्रकांत पाटील कोठून तरी शेतकरी वाटतात का हो...असा सवाल पवार यांनी उपस्थितांना केला, यांना यांचा तालुकाच नाही, बर तालुका नसला तर शेजारचा दत्तक घेऊन तेथे विकास करुन दाखवायचा सोडून हे बारामतीत येतात...वा रे पठ्ठ्या....अशा शब्दात अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविली.

Web Title: Ajit pawar critisieds chandrakant patil