Loksabha 2019: उदयनराजेंचा अर्ज भरण्यासाठी अजितदादा साताऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मिरवणूक मोती चौकात आल्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मिरवणुकीत सामील झाले.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले आज निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यासाठी मोठया संख्येने गांधी मैदानावर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्याबरोबर अजित पवार देखील येथे उपस्थित होते. 

 

आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत उदयनराजेंच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मोती चौकात आल्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मिरवणुकीत सामील झाले. उदयनराजे व अजित पवार यांच्यातील वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अशा परिस्थिती अजित पवारांनी अचानक एंट्री केल्याने सर्वांना सुखद धक्का बसला. 

अजितदादा जीपमध्ये चढल्यावर कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोश केला. संपूर्ण मिरवणुकीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: ajit pawar present at udayanraje bhosales loksabha election nomination rally in satara