Loksabha 2019 : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची रणनीती आखण्यास सुरुवात

मिलिंद संगई
बुधवार, 10 एप्रिल 2019

बारामती - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सकाळपासूनच बारामती शहरात प्रमुख कार्यकर्त्यांशी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात फिरताना बारामतीकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी अजित पवार बारकाईने घेताना दिसत असून, ही निवडणूकही त्यांनी नेहमीइतकीच गांभीर्याने घेतली आहे. 

अजित पवार यांनी आज सकाळपासूनच सहयोग या आपल्या निवासस्थानी आणि त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध पदाधिका-यांशी चर्चा केली. कोणाची नाराजी असेल तर त्यांना भेटून दूर करा, सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षात केलेले काम मतदारांना समजून सांगा, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पवार यांनी पदाधिका-यांना केल्या. 

दरम्यान बारामती शहरातील प्रचार यंत्रणेबाबत कण्हेरीच्या सभेतच अजित पवारांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. आज त्यांनी स्वताः बारामतीत हजेरी लावत नियोजन करुन दिले. पक्षातील सर्वच आजी माजी पदाधिकारी व प्रमुखांना प्रचारात सहभागी करुन घेत अनेकांशी आज पवारांनी स्वताः वैयक्तिक संवाद साधला. 

निवडणूक गांभीर्यानेच...
निवडणूक मग ती कोणतीही असो गांभीर्यानेच घ्यायची हा अजित पवारांचा शिरस्ता, त्या नुसार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूकीत बारामतीतून मताधिक्य वाढविण्याच्या उद्देशाने आज त्यांनी व्यूहरचना आखली आहे.

Web Title: Ajit Pawar started his strategy on the backdrop of the election