Loksabha 2019 : बारामतीत यावेळी परिवर्तन होणारच : अमर साबळे 

मिलिंद संगई
गुरुवार, 11 एप्रिल 2019

बारामती - बारामतीची जनता ही हुशार आहे. गेल्या निवडणूकीत परिवर्तनाची चुणूक मतदारांनी दाखविली होती. या निवडणूकीत निश्चित परिवर्तन होऊन भाजपच्या कांचन कुल विजयी होतील. असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला. 
साबळे हे गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी महायुतीच्या बारामती शहरातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर तो बोलत होते.

राज्यातीलच नाही तर देशातील लोक नरेंद्र मोदींच्याच पाठीशी आहेत. स.का.पाटील अत्यंत लोकप्रिय असताना त्यांचा पराभव होऊ शकतो तर पवार कुटुंबियाचा का नाही होणार, असा प्रश्न विचारत यंदा नक्की परिवर्तन होईल असा विश्वास अमर साबळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचा विस्तार पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रापुरताच झालेला असून राज्यातील त्यांची ताकद आता संपली आहे. शरद पवार यांच्या राजकारणालाही मोदींमुळे मर्यादा आल्या आहेत असेही ते म्हणाले. 

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही भाजपचीच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाची भावना आहे. ही भावना मतपेटीतून निश्चितपणे समोर येईल, असा विश्वासही साबळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Amar Sable Criticized Pawar Family and NCP