Loksabha 2019 : कन्हैया कुमार यांची तुलना दहशतवाद्याशी

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- कन्हैया कुमार देशाचे तुकडे करू इच्छित आहे

- कन्हैया दहशतवाद्यापेक्षा कमी नाही

नवी दिल्ली : बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांची तुलना दहशतवाद्याशी करण्यात आली आहे. ही तुलना बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी केली आहे. एका ट्विटला रिप्लाय देताना त्यांनी हे ट्विट केले आहे. 

बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते गिरिराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली असून, याच मतदारसंघातून कुमार निवडणूक लढवित आहेत. कन्हैया कुमार यांच्या पाठिंब्यासाठी जिग्नेश मेवानी यांच्यासह अभिनेत्री स्वरा भास्कर पुढे आल्या आहेत. तसेच स्वरा भास्कर यांच्याकडून ट्विटर पेजवरुनही कन्हैया कुमार यांचा प्रचार केला जात आहे.

कन्हैया कुमार यांनी ट्विरवर बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत ट्विट केले होते. त्यानंतर अशोक पंडित यांनी त्याच ट्विटला रिप्लाय दिला. त्यात त्यांनी सांगितले, की देशाचे तुकडे करण्याची कन्हैया कुमारची इच्छा आहे. तू दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीस.

Web Title: Ashok Pandit Compared Kanhaiya Kumar with Terrorist