Loksabha 2019 : योगी आदित्यनाथ, मायावती यांच्या प्रचारावर बंदी

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. अचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सांगत आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांसाठी व मायावती यांच्यावर 48 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे.

या बंदीमुळे योगी या पुढचे तीन दिवस व मायावती दोन दिवस प्रचार करू शकणार नाहीत. उद्यापासून म्हणजेच 16 एप्रिलला सकाळी 6 वाजल्यापासून ही बंदी सुरू होईल. यामुळे आपल्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार हे दोघे करू शकणार नाहीत. प्रचारसभेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आयोगाने सांगितले.  

लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच आलेली असताना योगी व मायावतींवर केलेल्या या बंदीचे परिणाम भाजप व बहुजन समाज पक्षाला बघायला मिळतील.

Web Title: Ban on Yogi Adityanath and Mayawati by election commission