Loksabha 2019 : बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार

मिलिंद संगई
शनिवार, 16 मार्च 2019

बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.
 पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांचा यात समावेश असून माधुरी मिसाळ या प्रभारी असून, वासुदेव काळे संयोजक आहेत. अॅड. सचिन सदावर्ते यांना निवडणूकीचे प्रमुखपद देण्यात आले असून, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे हे प्रचारप्रमुख असतील. 

या समितीत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जवळपास 36 जणांची ही व्यवस्थापन समिती असून, यात बारामतीतील सुरेंद्र जेवरे, किशोर कानिटकर, प्रशांत नाना सातव, दिलीप खैरे, रंजन तावरे, सतीश फाळके, अॅड. नितिन भामे, अॅड. शेखर दाते, ज्ञानेश्वर कौले आदींचा समावेश आहे. 

या व्यवस्थापन समितीत ज्यांच्यावर ज्या विभागाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे त्याने ती जबाबदारी संपूर्ण लोकसभा मतदारसंघनिहाय सांभाळायची असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सोमवारी उमेदवार ठरण्याची शक्यता...
सोमवारी (ता.18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांची पुण्यात समन्वय बैठक आहे. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्रीच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होते आहे. भाजपच्या या उमेदवाराला सेनेचे कार्यकर्तेही मदत करणार असल्याचे सांगितले गेले. 

शिवसेनेचेही संपर्कअभियान...
दरम्यान शिवसेनेकडूनही शिवसंपर्क अभियान राबविले गेले. जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे, संपर्कप्रमुख सत्यवान उभे, विलास भुजबळ, बाळासाहेब शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. युती झाल्यामुळे सेना भाजपच्याच उमेदवाराचा मनापासून प्रचार करेल, असे राजेंद्र काळे यांनी स्पष्ट केले आहे. किरकोळ मतभेद किंवा काही रुसवेफुगवे असतील तर कार्यकर्त्यांशी बोलून ते दूर केले जातील असे काळे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati's seat will be fought on the symbol of BJP's lotus