Election Results : लोकशाहीचा हा सर्वांत मोठा विजय : गडकरी

गुरुवार, 23 मे 2019

माझ्या जीवनात मी विरोधी पक्षातही काम केले.  लोकशाहीत सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.

मुंबई : माझ्या जीवनात मी विरोधी पक्षातही काम केले. लोकशाहीत सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकशाहीचा हा सर्वांत मोठा विजय आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले.

गडकरी म्हणाले, जनता निवडणुकीत आपला कौल देते. आपण सर्व मिळून मान-मर्यादेचा सन्मान केला पाहिजे. जनतेच्या निर्णयानंतर त्यांनी दिलेला कौल मान्य करायला हवा आणि त्यानुसार पुन्हा काम करायला हवे. 

2014 मध्ये लोकांच्या मनात असंतोष होता, नाराजी होती. त्यांच्या सरकारच्या काळात अनेक गैरव्यवहार झाले होते. आम्ही सर्व क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही गडकरी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the biggest victory of democracy says Nitin Gadkari