Loksabha 2019 : भाजपची लोकसभेची सातवी यादी जाहीर

Loksabha 2019 : भाजपची लोकसभेची सातवी यादी जाहीर

नवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच झारखंडच्या 11 व गुजरातच्या 14 जागांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांना; तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जे. पी. नड्डा यांनी ही माहिती दिली.

भाजपने आज जवळपास सात राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर केली. आतापावेतो पक्षाने 286 जागा जाहीर केल्याचे नड्डा यांनी सांगितले. आज जाहीर झालेल्यांमध्ये अनुराग ठाकूर (हमीरपूर), केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर (मोरेना) यांचा समावेश आहे. याशिवाय जनार्दन मिश्रा (रेवा) व राकेशसिंह (जबलपूर) यांचा समावेश आहे. जयंत सिन्हा यांना हजारीबाग येथून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे; तर निशिकांत दुबे झारखंडमधून तिकीट राखण्यात यशस्वी झाले. कर्नाटकातील मंड्या येथे अपक्ष उमेदवार सुमनलता यांना भाजपने पाठिंबा दिला आहे.

गुजरात व गोव्याच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रत्येकी तीन जागांचीही घोषणा करण्यात आली. कॉंग्रेसमधून आलेले दयानंद साप्टे यांना मांदेम येथून, फ्रान्सिस डिसूझा यांचे पुत्र जोशुआ यांना म्हापसा येथून व सुभाष शिरोडकर यांना शिरोडा मतदारसंघातून भाजपची तिकिटे जाहीर करण्यात आली आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com