LokSabha 2019 : भाजपने सुनील गायकवाड यांचे तिकीट कापले

Sunil gaikwad
Sunil gaikwad

लातूर : भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर झाली असून त्यात राज्यातील दोन विद्यमान खासदारांची तिकट कापण्यात आली आहेत. त्यामध्ये लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांची उमेदवारी पक्षाने नाकारत लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना तिकिट दिले आहे. डॉ गायकवाड हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्ची लातूरमध्ये सुरु होती. परंतु, गायकवाड यांनीच या चर्चेला पूर्ण विराम दिला असून पक्षाचा आदेशाप्रमाणे काम करणे असे त्यांनी म्हणले आहे.

गायकवाड म्हणाले, पक्षाने आजतागायत दोनवेळा खासदारकीची निवडणूक लढण्याची संधी दिली. त्याबद्दल पक्षाचे आभार. आता पक्षाचा जो आदेश प्राप्त होईल त्यानुसार काम करणार आहे. खासदार झाल्यानंतर स्वतःचा गट तयार करुन स्व अस्तित्व निर्माण केले नाही हीच माझी चुक झाली. संबंध लातूर जिल्ह्याला माहिती आहे की मी खासदार झाल्यानंतर काम केली आहेत म्हणून असेही गायकवाड म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com