Loksabha 2019 : भाजपकडून ज्येष्ठांचा अपमान : केजरीवाल

Loksabha 2019 : भाजपकडून ज्येष्ठांचा अपमान : केजरीवाल

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यावर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारून भाजपने त्यांचा अपमान केला. त्यांना उमेदवारी नाकारणारी मंडळी हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे.

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट कापण्यात आले. नेमक्या याच मुद्यावरून केजरीवाल यांनी भाजपवर टि्वटरवरून निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांनी घर बनवले. त्या ज्येष्ठ नेत्यांनाच घराबाहेर काढले. जी लोकं आपल्या वडीलधाऱ्यांचे होऊ शकत नाहीत तर ते कोणाचेही होऊ शकत नाही. हीच का ती भारतीय सभ्यता? हिंदू संस्कृती हे नाही सांगते, की ज्येष्ठांचा अपमान करा.

तसेच ते पुढे म्हणाले,  मोदीजी अडवानी, जोशी आणि सुषमा स्वराज यांचा अपमान का करत आहे?, अशी चर्चा देशातील लोकांमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com