Loksabha 2019 : आधी बारामती हातात घेऊ, मग पुढचं ठरवू : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

भाजपचे पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज (ता. 2) उमेदवारी अर्ज भरला. यावेळीस सर्व ज्येष्ठ नेते व मित्रपक्षातील नेते उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'आधी बारामती हातात येऊ द्या, मग पुढचे लक्ष्य ठरवू' असे म्हटले आहे. 

पुणे : भाजपचे पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज (ता. 2) उमेदवारी अर्ज भरला. यावेळीस सर्व ज्येष्ठ नेते व मित्रपक्षातील नेते उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'आधी बारामती हातात येऊ द्या, मग पुढचे लक्ष्य ठरवू' असे म्हटले आहे. 

'पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागांवर आमचे विशेष लक्ष आहे. पवारांचे राजकारण हे जातीय आणि फोडाफोडीचे पवारांचे आहे. तसेच पक्षाने मला सांगितलंय बारामतीत जाऊन राहा. मागच्या निवडणूकीपेक्षा आता समीकरणे बदललेली आहेत. काँग्रेस राज्यात उरलेली नाही, ती कोणी संपवली यावर चर्चा होऊ शकते, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात काँग्रेसचा उमेदवार हा अनेक चर्चेअंती अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आला. तरी त्यांना सक्षम उमेदवार देता आला नाही. तर सांगलीत वसंतदादांच्या नातवाला स्वाभिमानीची बॅट हातात घ्यावी लागली, ही काँग्रेसची हालत आहे, अशीही टीका पाटील यांनी यावेळी केली.

Web Title: BJP leader Chandrakant Patil criticized NCP in Pune