Loksabha 2019 : भाजपच्या 'या' खासदाराचा पत्ता होणार कट?

Loksabha 2019 : भाजपच्या 'या' खासदाराचा पत्ता होणार कट?

नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी केंद्रीयमंत्री रविशंकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. 

शत्रुघ्न सिन्हा हे पटणा येथील साहिब लोकसभा मतदारसघांचे विद्यमान खासदार आहेत. आता त्यांच्याऐवजी रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल (शनिवार) बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी रविशंकर प्रसाद यांच्या नावाची चर्चा झाली. 

गेल्या काही काळापासून शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून विविध कार्यक्रम, जाहीरसभांमधून भाजप नेतृत्वावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. पटणातील साहिब लोकसभा मतदारसंघासाठी रविशंकर प्रसाद यांच्यासह खासदार आर. के. सिन्हा यांच्याही नावाची चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com